महाराष्ट्राच्या मुलींचा अंतिम फेरीत प्रवेश

 



  •  कुमारांचा उपांत्य फेरीत प्रवेश
  • ४१ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा

 बन्सबेरिया (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील बन्सबेरिया (जि. होगळी) येथे सुरु असलेल्या ४१ व्या राष्ट्रीय कुमार-मुली खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकचा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात गतवर्षीचा उपविजेता ओडिसा संघाबरोबर होणार आहे. तर कुमार संघाने केरळचा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

बन्सीबेरी येथील खामरपारा सिशू संघ मैदानावर हे सामने सुरु आहेत. उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकचा १२-७ असा एक डाव  गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे अश्विनी शिंदे (२.३० मि. संरक्षण)दीपाली राठोड ( मि. संरक्षण व  गुण )प्रीती काळे (३.१० मी. संरक्षण ),  संपदा मोरे (२.३० मी. संरक्षण व  गुण )कल्याणी कंक (२.४० मि. संरक्षण )वृषाली भोये ( गुण )  यांनी चांगला खेळ केला. तर कर्नाटकच्या मान्या (१.४०१.३० मि. संरक्षण )विद्या गुण ) यांनी चांगला खेळ केला.

मुलींच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ओडिसा संघाने कोल्हापूरचा चूरशीच्या सामन्यात १०-९ असा १ गुणाने  पराभव केला. ओडिसा तर्फे अर्चना ( मि. संरक्षण व  गुण )स्मरणीका (२.१० मि. संरक्षण व  गुण)शुभश्री (१.५० मि. संरक्षण व  गुण ) असा खेळ करत विजयात मोलाची कामगिरी केली. तर स्वाती पाटील (२.२०१.१० मि. संरक्षण व  गुण )वैष्णवी पवार (१.२० मि.२.२० मि. संरक्षण )पूर्वा मोडक (१.३०१.४० मि. संरक्षण ) यांनी चांगला खेळ केला. मात्र त्यांना पराभव टाळता आला नाही.

तत्पूर्वी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी दिल्लीवर १२-७ असा एक डाव  गुणांनी धुव्वा उडवला. मुलींच्या दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरने राजस्थानचा १०-५ असा एक डाव ५ गुणांनी असा पराभव केला.   

कुमार गटात महाराष्ट्राने केरळचा १९-९ असा एक डाव ९ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रातर्फे सुरज झोरे (१.५० २.४० मि. संरक्षण)निखिल सोडये (१.५० मि संरक्षण व  गुण )बिका चेतन (१. २ मि. संरक्षण व  गुण )गणेश बोरकर ( गुण ) यांनी चांगला खेळ केला. केरळ तर्फे अमोल राहसेम ( मि. संरक्षण )सुबीन ( गुण ) यांनी खेळ केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाला प. बंगालचे आव्हान असणार आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post