नीरज कांबळेने विजेतेपद पटकाविले

 


  • कै. दशरथ येलवे स्मृती ३० व्या सब - जुनिअर व जुनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

मुंबई: मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट दादरच्या सहयोगाने कै. दशरथ येलवे स्मृती ३० व्या सब - जुनिअर व जुनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या २१ वर्षांखालील मुलांच्या गटात डी के सी सीच्या नीरज कांबळेने शिवतारा कॅरम क्लबच्या तन्वीर शेखला ११-२१, १२-११ व १०-७ अशा तीत सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभूत करून या गटाचे विजेतेपद मिळविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत डी के सी सी च्या सार्थक नागावकरने ए के फाऊंडेशनच्या कार्तिक खुमानवर १९-१, ११-३ असा विजय मिळविला. 
       १८ वर्षांखालील मुलांमध्ये अंतिम सामन्यात डी के सी सी च्या मिहीर शेखने शिवताराच्या शेख महम्मद रजा शेखवर १५-१२, २०-४ असा सरळ विजय मिळविला. तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत ए के फाऊंडेशनच्या नीलांश चिपळूणकरने डी के सी सी च्या सार्थ मोरेवर १९-१२, २१-४ अशा विजयाची नोंद केली. 
      मुलींच्या १८ वर्षांखालील गटात अंतिम फेरीत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नायगावच्या सेजल लोखंडेने डी के सी सी च्या सिमरन शिंदेवर तीन सेटमध्ये १६-२, ०-८ व १२-० असा विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ए के फाऊंडेशनच्या रुची माचीवालेने श्री वागड कला केंद्राच्या सारा कारयाला १७-४, २१-७ असे चीत केले. 
    १४ वर्षांखालील मुलांमध्ये ए के फाऊंडेशनच्या राहुल पाटीलने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नायगावच्या तनिश गवारेला २१-०, २१-० असे सहज नमवून या गटाचे विजेतेपद मिळविले. तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नायगावच्या विघ्नेश सावरकरने त्यांच्याच क्लबच्या सिद्धांत मोरेवर २१-०, १३-० अशी मात केली. 
      विजेत्यांना विश्व् विजेत्या कॅरमपटू प्रशांत मोरें, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद साचिव यतिन ठाकूर, मुंबई, तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्यध्यक्ष धनंजय पवार, उपाध्यक्ष केतन चिखले व मानद सरचिटणीस अरुण केदार यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आंतर राष्ट्रीय पंच अजित सावंत व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सहसचिव संजय बर्वे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post