शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 


डोंबिवली / शंकर जाधव : विश्वरत्न महामानव परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे डोंबिवली शहर शाखा डोंबिवली पश्चिमेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नागरिकांसाठी पाणपोईचे उभारण्यात आली. याप्रसंगी कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, माजी नगरसेवक तथा उपजिल्हा प्रमुख तात्या माने, महिला जिल्हा संघटक कविता गावंड, युवा जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील, महिला उप जिल्हा संघटक वैशाली दरेकर , डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख किशोर मानकामे, शहर संघटक ( पश्चिम ) किरण मोडकर,डोंबिवली पश्चिम उपशहर संघटक संजय पाटील,उपशहर प्रमुख तानाजी मालुसरे, उपशहर संघटक ( पश्चिम ) रोहित मात्रे, उपशहर संघटक ( पश्चिम ), उपविभाग प्रमुख नितीन पवार, युवा अधिकारी ऋतुनील पावसकर,शाखाप्रमुख राजेश पाटील सुरज पवार विभाग प्रमुख सुरज पवार आणि प्रमोद कांबळे यांसह काँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post