महाराष्ट्र केसरी सईद चाऊसने केले कौतुक
डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव ठाकुर्ली येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक शाळेच्या पटांगणात भरविलेल्या कुस्ती सामन्यात डोंबिवलीतील कुंभारखानपाड्यातील अक्षय भोईर या पैलवानाने सरवलीतील पैलवान रोशन चौधरीला हरवून डोंबिवलीचे नाव उंचावले. या सामन्यात ठाणे जिल्ह्यातील अनेक कुस्तीपट्टूने भाग घेतला होता.विशेष हे सामने पाहण्यासाठी महाराष्ट्र केसरी सईद चाऊस हे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र केसरी चाऊस म्हणाले, कुस्तीचे सामने डोंबिवली शहरात आयोजित केल्याने ते पाहण्यासाठी याठिकाणी आलो.कुस्ती सामने आयोजित करून माजी महापौर पुडलिंक म्हात्रे व शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचे आभार मानतो.ग्रामीण भागातील मातीतील हा खेळ शहरी भागातही खेळला जात असल्याने खूप आनंद होत आहे.सांगली येथे पार पडलेल्या महाराष्ट्र पहिली महिला केसरीत कल्याण मधील वैष्णवी पाटील ही उपविजेती ठरली.याबबद्दल तिचे अभिनंदन करतो.सरकारने विजेत्या कुस्तीपट्टूचाही अधिकाधिक विचार करणे आवश्यक आहे.
तर शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे म्हणाले, कुस्ती हा मातीतला खेळ आहे. डोंबिवलीत अनेक वर्षापासून कुस्तीचे सामने भरविले जाते.असे सामने प्रत्येक शहरात भरविल्यास खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल.
