Kdmc cleaning : स्वच्छता अभियानात केडीएमसीचे श्रमदान

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार १ ऑक्टोंबर रोजी देशभरात स्वच्छता अभियान अंतर्गत एक दिवस एक तास श्रमदान मोहीम राबविण्यात आली. कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेने डोंबिवली शहरात मोहिम राबविली.या मोहिमेत 'ह' प्रभाग सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, पथकप्रमुख विजय भोईर, तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक व अधिकारी , कर्मचारी, माजी नगरसेवक विकास म्हात्रे, राजेश मोरे, राजेश म्हात्रे आदींनी श्रमदान केले.



Post a Comment

Previous Post Next Post