Kdmc news : गणेशोत्सवाच्या कालावधीत अस्वच्छता करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई


कल्याण (शंकर जाधव) : श्री गणेशोत्सव सणानिमीत्त कल्याण - डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये विशेषत: गणेश विसर्जन तलावांचे ठिकाणी तसेच विसर्जन मार्गिका यांवर चोख स्वच्छता राखणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी निर्देश दिलेले आहेत.


त्यानुसार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी आज आधारवाडी चौक ते दुर्गाडी, तसेच दुर्गाडी ते गोविंदवाडी बायपास या मार्गांची पहाणी केली.  सदर मार्गावर वाहतुकीस तसेच स्वच्छतेकामी अडथळा येत असल्याकारणाने रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या केलेल्या एकूण १५ वाहनांवर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील व कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांचे नियंत्रणांतर्गत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस नाईक वॉर्डन व घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी यांचेमार्फत संयुक्तीकरित्या कारवाई करण्यात आली.  सदर वाहनांचे मालकांना नोटीस बजावण्यात आल्या असून याकारिता दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post