अधिक पारदर्शक व नागरिकांसाठी सोयीस्कर धोरण लागू
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता हस्तांतरण शुल्क आकारणीच्या धोरणात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून, यामुळे शुल्क आकारणी अधिक पारदर्शक होणार आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मंजुरीनंतर हा निर्णय ७ जुलै २०२५ पासून लागू झाला आहे.
मुख्य बदल
शुल्क निश्चिती रेडीरेकनरवर आधारित असेल.
वारसा प्रकरणांमध्ये केवळ ₹५०० किंवा मुद्रांक शुल्क (जे कमी असेल) आकारले जाणार.
विलंब शुल्काची नवी तरतूद १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू.
विलंब शुल्क = चालू वर्षाच्या एप्रिलमधील RBI लेडींग रेट + ३% वार्षिक.
नोंदणीकृत दस्तऐवज, कंपनी नाव/पॅन बदल, बाजारमूल्य नोंद नसलेले दस्त, अपवादात्मक प्रकरणे यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे.
महापालिकेने सर्व मालमत्ता धारकांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, सविस्तर माहिती www.nmmc.gov.in वर उपलब्ध आहे.
إرسال تعليق