डोंबिवली \ शंकर जाधव : शिवसेना उपशहरप्रमुख, तरुण मित्रमंडळाचे माजी सचिव, स्थानिक लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष आणि ओंजळ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अरविंद बिरमोळे यांचे शुक्रवारी ८ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते कल्याण ग्रामीण सहसंपर्कप्रमुख होते.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे त्यांनी प्रदीर्घ सेवा करून निवृत्ती घेतली होती. सेवेत असताना स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून सहकाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
बिरमोळे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
إرسال تعليق