हैदराबाद : महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी तेलंगणाचे आयटी मंत्री केटीआर यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद टी-हबमधील स्टार्टअप्स, त्यांचे नवकल्पक आणि विचारवंत यांचे कौतुक केले. आदित्य ठाकरे यांनी नमूद केले की, जेव्हा जेव्हा मंत्री केटीआर यांच्यासोबत भेट होते, ती भेट छान आणि उत्साहवर्धक असल्याचे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले.
गेल्या वर्षी दावोसमध्ये झालेल्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांची पुन्हा भेट झाल्यामुळे मंत्री केटीआर आनंदित झाले होते. मंत्री केटीआर म्हणाले की, भविष्यात आणखी सभा व्हाव्यात. मी केटीआर यांच्याशी शाश्वतता, शहरीकरण, तंत्रज्ञान आणि देशाच्या विकासातील त्यांची भूमिका याविषयी चर्चा केली आहे, तसेच केटीआरसोबतची भेट नेहमीच छान आणि प्रेरणादायी असते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
