डोंबिवली / शंकर जाधव : शिस्तीचे पालन न करता प्रवाशांना उद्धट उत्तरे देणे, गणवेश परिधान न करणे, जवळचे भाडे नाकारणे, ओळखपत्र नसणे, प्रवाशाला मारहाण अशा घटनांमुळे रिक्षाचालकांन कारवाईला समोरे जावे लागते. प्रवाशांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास पोलिसांकडून अटक केली जाते. अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभाग आणिवाहतूक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत सोमवारी डोंबिवलीत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
डोंबिवली स्टेशन परिसर, इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक येथे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १२ रिक्षाचालकांवर कारवाई करत एकूण १ लाख २० हजार रुपये दंड आकारण्यात आला. तर डोंबिवली वाहतूक विभागाकडून २९ रिक्षाचालकांवर कारवाई करत २२,५५० रुपये दंड आकारण्यात आला. डोंबिवलीतील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक विभागाचे व्पोनी उमेश गित्ते यांनी सांगितले.
