BSNL चा स्वस्तात आनंद देणारा मस्त प्लॅन

७९७ रुपयात ३०० दिवसांचा अमर्यादित प्लॅन 




नवी दिल्ली :  खासगी दूरसंचार कंपन्यांनी (Jio, Airtel, Vi) रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढविल्यानंतर आता BSNL आपल्या ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन्स (BSNL Cheapest Recharge Plans) देण्याचा निर्णय घेतला आहे.  दूरसंचार क्षेत्रात, आता सरकारी कंपनी BSNL हा एकमेव पर्याय आहे ज्याकडे सर्वात कमी किमतीचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत.  BSNL च्या यादीत अशा काही योजना आहेत, ज्या सर्वात कमी किमतीत ३०० दिवसांपर्यंत इंटरनेटचा आनंद मिळवून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ अशा प्लॅनबाबत. 


जर तुम्हाला कमी किमतीत दीर्घ वैधता हवी असेल तर बीएसएनएलकडे यासाठी अनेक उत्तम योजना आहेत. BSNL ने आपल्या करोडो वापरकर्त्यांसाठी आपल्या यादीत Rs ७९७ चा प्लॅन जोडला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ३०० दिवसांची दीर्घ वैधता देण्यात आलेली आहे.  Jio आणि Airtel सारख्या मोठ्या कंपन्या तुम्हाला याच किमतीत फक्त ८४ दिवस किंवा ९० दिवसांची वैधता ऑफर करतात, तिथे BSNL तुम्हाला ३०० दिवसांच्या वैधतेची उत्तम ऑफर देत आहे.


BSNL च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला ३०० दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कवर मोफत अमर्यादित कॉलची ऑफर मिळते. तुम्ही जास्त डेटा वापरत असलात तरी हा प्लॅन तुमच्यासाठी खास आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २ GB डेटा मिळेल. तथापि, तुम्हाला हा २ GB दैनिक डेटा फक्त ६० दिवसांसाठी मिळेल. यासोबतच कंपनी तुम्हाला ६० दिवसांसाठी दररोज १०० मोफत एसएमएस देखील देते.

BSNL अमर्यादित प्रीपेड योजना

 STV११८ – BSNL च्या या प्लॅनमध्ये २० दिवसांची वैधता दिली जात आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएस आणि १०GB डेटासह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग प्लॅनचा लाभ मिळेल.

 सरकारी टेलिकॉम कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये PV१५३ – २६ दिवसांची वैधता दिली जात आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला २६GB डेटाचा फायदा मिळेल. तसेच, तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल.

 PV१९९– BSNL चा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज २GB डेटा, १०० मोफत एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल.

 STV३४७ – BSNL च्या ५४-दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना दररोज २GB डेटा, १०० मोफत SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल. 

 STV५९९ – सरकारी टेलिकॉम कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज ३GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनची ​​वैधता ८४ दिवसांची आहे. 

 PV९९७– BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये, १६० दिवसांच्या वैधतेसह, वापरकर्त्यांना दररोज २GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० मोफत SMS यासारखे फायदे दिले जात आहेत.




 

Post a Comment

Previous Post Next Post