Kulgam firing : कुलगामच्या दुहेरी चकमकीत ६ दहशतवादी ठार

लष्कराचे २ पॅरा एसएफ जवान शहीद




 कुलगाम : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममधील चनीगाम गाव आणि मोदरघममध्ये सुरू असलेल्या दुहेरी चकमकीत ६ दहशतवादी ठार झाले आहेत. चनीगाममध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, मोदरघममध्ये झालेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. या कारवाईत लान्स नाईक प्रदीप कुमार आणि प्रवीण जंजाल प्रभाकर हे भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. दोन्ही ठिकाणी सुमारे २० तास जीवघेणी कारवाई सुरूच आहे.


दक्षिण काश्मीरच्या कुलगाम भागात शनिवारी रात्री उशिरा सुरू झालेली ही कारवाई अजूनही सुरू आहे. अजूनही येथे दहशतवादी लपल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर लगेचच दहशतवादविरोधी कारवाई सुरू करण्यात आली. दोन्ही ठिकाणी नाकाबंदीसह शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि त्यानंतर त्याचे चकमकीत रूपांतर झाले.


काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) व्ही. के. बिर्डी यांनी सांगितले की, ही कारवाई सुरूच राहणार आहे. काही दहशतवाद्यांचे मृतदेह दिसले आहेत, पण चकमक अजून संपलेली नाही, असे ते म्हणाले. चकमकीचे ठिकाण जिल्ह्याच्या अंतर्गत भागात आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दले दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.


चकमक स्थळावरून चार दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्या ताब्यातून तीन एके ४७ आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनच्या टीआरएफशी संबंधित होते. यावर बशीर मुलगा बशीर अहमद दार, रहिवासी कैमोह, जाहिद अहमद दार मुलगा गमहौद दार रा. यारीपोरा, तौहीद अहमद राथेर मुलगा अब सतार राथेर, शकील अहमद वानी मुलगा मोहम्मद शरीफ वानी रा. कुलगाम अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. उर्वरित दोन दहशतवाद्यांची ओळख पटणे बाकी आहे. 





पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी पोलीस आणि सुरक्षा दलाच्या एका पथकाने विशिष्ट माहितीच्या आधारे कुलगामच्या मुद्रघम भागात घेराबंदी आणि शोध मोहीम राबवली. सुरक्षा दल संशयित भागाकडे सरकताच लपलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे चकमक सुरू झाली. 


 सुरुवातीच्या गोळीबारात लष्कराचा एक जवान जखमी झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर सुरक्षा दलांनी सावधगिरीने कारवाई सुरू ठेवली. अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाऊ नयेत म्हणून संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आलेेेला आहे.




   पॅरा कमांडो लान्स नाईक प्रदीप नैन आणि प्रवीण प्रभाकर


 



Post a Comment

Previous Post Next Post