दिवा पोलीस चौकीत महिला पोलीस उपनिरीक्षक अनु शर्मा यांची नियुक्ती

 


भाजप महिला मोर्चाच्या मागणीला यश; महिलांमध्ये समाधानाचे वातावरण

दिवा / आरती परब :  दिवा शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, दिवा शहराच्या अध्यक्षा सपना रोशन भगत यांनी दिव्यातील पोलीस चौकीत महिला पोलीस अधिकारी नियुक्त करण्याची केलेली मागणी अखेर मान्य करण्यात आली असून, उपनिरीक्षक अनु शर्मा यांची दिवा पोलिस चौकीत नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती आजपासून अधिकृतपणे अमलात आली असून, अनु शर्मा यांनी आपला कार्यभार स्वीकारला आहे. या निर्णयामुळे दिवा परिसरातील महिलांमध्ये एक प्रकारचा दिलासा आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सपना भगत यांनी दिनांक २८ जुलै २०२५ रोजी ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करत दिवा शहरातील महिला अत्याचार, छेडछाड, व इतर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याकडे लक्ष वेधले होते. त्याचप्रमाणे, महिलांना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवताना येणाऱ्या अडचणी आणि संकोच या बाबतीतही त्यांनी चिंता व्यक्त केली होती.


या निवेदनाची पोलीस विभागाने तात्काळ दखल घेत आजपासून दिवा पोलिस चौकीत महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून अनु शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. या निमित्ताने सपना भगत यांनी अनु शर्मा यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी भाजप महिला कार्यकर्त्या, स्थानिक नागरिक आणि महिलांनीही यावेळी सहभाग घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक महिलांनी या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले की, “आता आमच्या समस्या आणि तक्रारी आम्ही बिनधास्तपणे मांडू शकतो.


 सपना भगत या गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध पातळीवर आवाज उठवत असून, त्यांनी पूर्वीही सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीबाबत पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली होती.

Post a Comment

أحدث أقدم