दिवा \ आरती परब: ग्लोबल स्कूलमध्ये सलग तिसऱ्या वर्षी भव्य ऐतिहासिक म्युझियमचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी रुची निर्माण व्हावी, भारतीय वारसा समजावा आणि आपली प्राचीन संस्कृतीची माहिती व्हावी तसेच ती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळावी म्हणून हे विशेष प्रदर्शन भरवण्यात आले.
या म्युझियममध्ये विद्यार्थ्यांनी सिंधू, हडप्पा संस्कृती प्राचीन अवशेषांची प्रतिकृती, शस्त्रसामग्री, नाणे, ताम्रपट, शिलालेख, वेशभूषा यांचे विद्यार्थ्यांसाठी आकर्षक सादरीकरण केले. यंदा विशेष आकर्षण ठरले ते मौर्य, गुप्त आणि मराठा साम्राज्याच्या मॉडेल्सचे जिवंत सादरीकरण.
हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना इतिहासाचे जतन आणि संवर्धन करण्याची माहिती होत राहील असा विश्वास शाळेने व्यक्त केला.


