दिवा / आरती मुळीक परब: फेसबुक आणि वॉट्सअप वर टाकलेला मॅसेज आपल्यालाच उद्देशून लिहला आहे, असा चुकीचा समज करून दिवा भाजपचे अध्यक्ष यांनी शिवसेना दिवा शहर व शिवसेना दिवा उपशहर प्रमुख अँड. आदेश भगत यांच्या विषयी खोटी आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करून तीच माहिती पत्रकारांना दिली व खोट्या बातम्या छापून त्या सोशल मीडियावर वायरल केल्यामुळे अँड. आदेश भगत यांनी त्यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली असता मुंब्रा पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ५०१ अंतर्गत दिवा भाजप अध्यक्ष यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक ११ एप्रिल रोजी दिव्यातील सोशल मीडियावर बंटी और बबली या काल्पनिक जोडी विषयी मजकूर वायरल करण्यात आला होता. सदर मजकुरात भाजपने केलेल्या आंदोलनाचा कोणताही थेट उल्लेख करण्यात आला नव्हता. तसेच कुठल्याही पक्षाचा व पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. सदर मॅसेज मध्ये बंटी और बबली या कल्पिनक ठग जोडी विषयी लिहिण्यात आले होते. बंटी और बबली नावाची ही जोडी ब्लॅकमेलर आहे, लोकांना पैशाचा गंडा घालणारी आहे. अधिकारी, व्यावसायिक व नेत्यांना त्यांच्या विरोधात वर्तमात पत्रात खोटी माहिती देण्याची धमकी देऊन पैसे उकळणारी आहे, अशा आशयाचा मजकूर लिहण्यात आला होता. असे असताना वायरल झालेला मसेज आम्हालाच उद्देशून लिहण्यात आल्याचा गैरसमज करून दिवा भाजप अध्यक्ष यांनी शिवसेना दिवा शहर व शिवसेना उपशहर प्रमुख अँड. आदेश भगत यांच्याविरोधात खोटी माहिती पत्रकारांना देऊन सोशल मीडियावर त्यांची बदनामी करण्याचे काम केलं होतं.
मी कोणत्याही पक्षाचा, पदाधिकाऱ्यांच्या नावाचा, आंदोलनाचा व महिलांचा अपमान करणारी पोस्ट टाकलेली नसताना माझ्या नावाचा उल्लेख करून तसा मजकूर सोशल मीडियावर टाकून व खोटी माहिती पत्रकारांना पुरवून बदनामीकारक बातमी छापून आणली व ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. मी त्यासंदर्भात तक्रार केल्याने पोलिसांनी सर्व माहिती तपासून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यासाठी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो
- अँड. आदेश भगत, शिवसेना उपशहर प्रमुख, दिवा
Tags
महाराष्ट्र
