आज प्रदर्शित होणार कौमार्य चित्रपट

 


मुंबई : कौमार्य चाचणी ही कुप्रथा असून काही समाजांत अद्याप जातपंचायतीच्या पंचांसमोर कौमार्य परीक्षा घेतली जाते. स्त्रीच्या लैंगिक संभोगाची पहिली कृती सामान्यतः अनेक संस्कृतींमध्ये एक महत्त्वपूर्ण वैयक्तिक मैलाचा दगड मानली जाते. ही अमानवी व भेदभाव करणारी कौमार्यांचे प्रमाण संस्कृतीनुसार बदलते ही तपासणी लग्नाच्या पहिल्या रात्री करण्याची प्रथा आजही २१ व्या शतकात केली जाते. कौमार्य चाचणी करायला भाग पाडणारी व्यवस्था जात पंचायतीच्या रुपाने कंजारभाट समाजात रुढ असताना त्याचे अधिक भयावह आणि किळसवाणे रुप आहे. कौमार्य चाचणीसाठी लैंगिक संबंध करण्यास कुणाची इच्छा न झाल्यास त्याला चक्क पॉर्न फिल्म दाखविली जाते. तरीही दाम्पत्य संबंधास तयार नसेल तर अन्य एखादे दाम्पत्य चक्क त्यांच्यासमोर ‘सेक्स’चा डेमो करुन दाखवते, अशा कुप्रवृत्तीचा विरोध होणे गरजेचे आहे.

       अशा चुकीच्या परंपरांवर आधारित या संवेदनशील विषयावर निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांनी 'कौमार्य' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट आज पासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सलीम शेख आहेत. यात अभिनेते नागेश भोसले, नायक शादाव, नायिका पूजा शाहू या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा सबजेक्ट खूप संवेदनशील आहे. स्त्रीच्या कौमार्य तपासणी करण्याची कुप्रथेवर आधारित हा चित्रपट आहे. जसे पुरुष लग्नासाठी वर्जिन मुलगी इच्छितात, तसेच मुलींनी वर्जिन मुलाशीच लग्न करण्याची मागणी केली तर काय होईल ? खरे तर स्त्रियांवर हा पुरुषप्रधान संस्कृतीचा अन्याय आहे हाच विचार या सिनेमातून मांडला जाणार आहे. या सिनेमातून अभिनेत्री पूजा शाहू पदार्पण करतेय.



Post a Comment

Previous Post Next Post