डोंबिवली ( शंकर जाधव ) 'शासन आपल्या दारी' याेजनेअंतर्गत भारतीय जनता पार्टी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत (ABHA) कार्डच रजिस्ट्रेशन भाजप माजी नगरसेवक विश्वदिप सुभाष पवार यांच्या पूर्वेकडील रेणुका सदन,सी.के.पी. हॉल जवळ,गडकरी पथ येथे शनिवार ८ तारखेला शिबिर आयोजित केले होते. कार्डसाठी आवश्यक आधार कार्ड , आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक कागदपत्र आहेत.या योजनेमुळे आता आपले जुने हॉस्पिटलचे रीपोर्ट घेऊन फिरावे लागणार नाही.
कार्डवर आपल्याला ऑनलाईन उपचार टेलीमेडिसीन सारखी सुविधा फाेनवर मिळेल अशी माहिती भाजप माजी नगरसेवक विश्वदिप पवार यांनी सांगितले.माजी नगरसेवक पवार म्हणाले, शासन आपल्या दारी या योजनेंतर्गत जनतेपर्यत हे शासन पोहचून सर्व योजनांची माहिती देत आहे.सर्व योजनांचा फायदा नागरिकांना होत असल्याने देशातील प्रत्येक नागरिक पंतप्रधान मोदी यांचे आभार मानत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांसह सर्वांचे आभार मानतो असे म्हटले.
