पालिकेसह बांधकाम विभागाचेही रस्ते खड्डेमय
राज्य शासनाचा उपक्रम ' खड्डे आपल्या दारी' -मनसे
'झोपी गेलेला जागा झाला'भाजपचे प्रतिउत्तर
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण- डोंबिवली महानगर पालिका हद्दीत पावसाळ्यात खड्डे पडणे नागरिकांना नवीन नाही.आता बांधकाम विभागाच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने मनसेने बांधकाम विभागावर बोलताना या खात्याचे मंत्री चव्हाण यांच्यावर टीका केली.यावर भाजपाने मनसेच्या टीकेला उत्तर देताना निवडणूका जवळ आल्याने मनसेने ' झोपी गेलेला जागा झाला' हे नाटक पाहिले असावेत असे सांगितले.खड्ड्यांवरून मनसे - भाजपात जुंपल्याचे दिसते.
पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे हे चित्र कल्याण - डोंबिवलीकरांना नवीन नाही. जुलै महिन्याच्या सुरूवातीला पावसाने कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या कामकाजाची पोलखोल केल्याचे दिसते.उत्कृष्ट दर्जाचे रस्ते बनविणे सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी असताना याकामी ते अपयशी झाल्याचे दिसते.डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डे पाहून ' राज्य शासनाचा उपक्रम- खड्डे आपल्या दारी' हा उपक्रम राबवित असल्याची खोचक टीका मनसेने केली आहे.मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांनी शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेवर जाब विचारला आहे.डोंबिवलीतील अंर्तगत रस्ते आणि पूर्वेकडील के.व्ही.पेंढारकर महाविद्यालयासमोरील खड्डेमय झाला आहे.हा रस्ता बांधकाम विभागाने लवकरात लवकर खड्डेमुक्त करावे असे अन्यथा मनसे आंदोलन करेल असा इशारा दिला.
मंत्री चव्हाण यांच्यावरही मनसे शहरअध्यक्ष घरत यांनी टीका केली.या टिकेला उत्तर देताना भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब यांनी उत्तर दिले.ते म्हणाले, मला वाटत मनसेने 'झोपी गेलेला जागा झाला' हे नाटक पाहिले असावेत.पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात होणार बसल्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान , या पावसाळ्यात 'खड्डा' वर राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसते.खड्डयाबाबत मनसे व भाजप समोरासमोर येतील असे बोलले जात आहे.


