ठाणे : जालन्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणादरम्यान झालेल्या लाठीचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. अशातच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सर्वपक्षीय मराठा समन्वयकांनी ठाणे बंदची ( Thane band) हाक दिली आहे. या बंदमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (udhav thakrey), काँग्रेस आणि मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट यांनी या बंदमधून माघार घेतली आहे. ठाण्यात या बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी, भाजीवाले यांनी धाकाने का होईना या बंदला प्रतिसाद दिला. मात्र सामान्य नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागला.
सोमवारी सकाळपासूनच रेल्वे स्थानक परिसर, नौपाडा, वागळे स्टेट, घोडबंदर रोड परिसरात बंदचा परिणाम दिसला. काही आस्थापना नागरिकांनी स्वतःहून बंद ठेवल्या तर काही ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी दिलेल्या आवाहनाला नागरिकांनी पाठिंबा दिला. ठाण्यात कोणताही अनुचित प्रकार पहायला मिळालेला नसून, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे. रॅली, रास्ता रोको न करता अहिंसक मार्गाने बंद यशस्वी करण्याचा निर्धार मराठा समाजातील समन्वयकांनी केला आहे. तर या बंदच्या आडून शहरात कायदा-सुव्यस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रिक्षांची संख्या दररोजच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे नोकरदार आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. मनोज जरांगे यांना जर काही झाले तर महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.
जालना शहर आणि जिल्ह्यातील गावागावांमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास येत्या १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे यांनी दिली आहे. मराठा आंदोलनाचे आंदोलनाचे लोण आता गावागावात जाऊन पोहचले आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापण्याची शक्यता आहे.
Tag : # ठाणे बंद (thane band) # सर्व पक्षांचा पाठिंबा # शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची माघार # ठाणे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
.jpeg)
.jpeg)
.jpeg)