ज्येष्ठ नागरिक कट्टा व वृत्तपत्र वाचनालयाचे उदघाटन

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्था  डोंबिवली  संस्थाचे मार्गदर्शक तथा शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्या स्वखर्चाने ज्येष्ठ नागरिक कट्टा व वृत्तपत्र वाचनालय बनविण्यात आले.याचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

त्या प्रसंगी उपस्थित समाजसेवक सुजित  नलावडे, विजय बाकाडे,  संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव, कार्याध्यक्ष दीपक वारंग, उपाध्यक्ष राजु धारवणे, बाळु घरत, संतोष कदम,  सचिव राजेश जयस्वाल, खजिनदार लक्ष्मण फडतरे, राजु पाटील,अनिल  शिंदे, तानाजी आहेर, कार्यालय प्रमुख  काशीराम साळवी  व सर्व  सभासद कार्याकते उपस्थित  होते.



Post a Comment

Previous Post Next Post