केडीएमसी आरोग्य विभागाबाहेर मनसेचे आंदोलन


  •  पालिकेच्या रुग्णालयाबाहेर महिलेची प्रसूती 
  • गेटवर शाल, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी अडकवले

डोंबिवली ( शंकर जाधव ) :   रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या महिलेच्या प्रसूतीनंतर आक्रमक झालेल्या मनसेने सोमवारी कल्याण येथील पालिकेच्या मुख्यालयात आरोग्य विभागाबाहेर आंदोलन केले. 'वैद्यकीय अधिकारी हाय हाय', 'केडीएमसी प्रशासन हाय हाय' आणि 'रुक्मिणीबाई रुग्णालय बंद करा' अशा घोषणा देत मनसैनिकांनी आरोग्य विभागाच्या प्रवेशद्वार ओढणी बांधून बंद केले. मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाचे प्रवेशद्वार आपली ओढणी बांधून बंद केले. तसेच या प्रवेशद्वारावर शाल, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी अडकवून वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. 

शनिवारी रात्री कल्याण रेल्वे स्टेशनजवळ महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्याने काही महिला व पोलिसांनी महिलेला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसूती झाली. या घटनेचा सोमवारी मनसे केडीएमसी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी महापालिका मुख्यालयात गेले. मनसैनिकांनी पालिका मुख्यालयातील आरोग्य विभागात जाण्याचा प्रयत्न केला असता येथील सुरक्षा रक्षकांनी अडविले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी पाटील या कार्यालयात आल्या नव्हत्या. वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे समजताच मनसैनिक आरोग्य विभागाचसमोर ठिय्या दिल्या. संतप्त मनसैनिकांनी 'वैद्यकीय अधिकारी हाय हाय'च्या घोषणा दिल्या. मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाचे प्रवेशद्वार आपली ओढणी बांधून बंद केले. तसेच या प्रवेशद्वारावर शाल, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी अडकवून वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.      


या घटनेनंतर केडीएमसी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की आपण किती खोटारडे आणि निर्लज्ज आहेत.केडीएमसी आयुक्तांनी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई केली तर ठीक आहे. मात्र तसे न झाल्यास त्यांची मनसेशी गाठ असून त्यांना मनसे स्टाईल इंगा दाखवला जाईल. 

उल्हास भोईर ( मनसे जिल्हाध्यक्ष ) 

  

रुक्मिणीबाई रुग्णालयात घडलेल्या घटनेची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशीचे निर्देश दिले असून त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच रुग्णालय प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवणे आवश्यक असून अशा घटना घडल्याला नकोत. चौकशीअंती जे काही समोर येईल त्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.

 डॉ. भाऊसाहेब दांगडे ( आयुक्त )

Post a Comment

Previous Post Next Post