मूर्ती विसर्जन करणे होणार सोयीस्कर

 


कल्याण- डोंबिवलीत गणेश विसर्जनासाठी फ्लोटिंग जेट्टीचा प्रयोग

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण - डोंबिवलीतील गणेश विसर्जन यंदा सोयीस्कर होणार आहे. गणपती विसर्जनासाठी प्रथमच फ्लाेटिंग जेट्टीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा बाप्पाचे विसर्जन जलदगतीने होणार आहे.

डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव खाडीनजीकच्या गणेश विसर्जन घाटावर माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्या मार्फत ही व्यवस्था करण्यात आली आहे. ही फ्लोटिंग जेट्टी १० टन वजन घेऊ शकते. गणेश मंडळासह घरगूती मूर्ती विसर्जन करणे या जेट्टीमुळे सोयीस्कर होणार आहे. तसेच विसर्जनासाठी कमी वेळ लागणार आहे.


Tag : # कल्याण - डोंबिवलीतील गणेश विसर्जन सोयीस्कर # विसर्जनासाठी फ्लाेटिंग जेट्टी # माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे # मोठा गाव खाडीनजीक फ्लाेटिंग जेट्टी

Post a Comment

Previous Post Next Post