नाशिक: शहरातील रिक्षा, टॅक्सीचालकांनी श्रमिक सेनेतर्फे आपल्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन २१ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या निवेदनाला जवळपास दोन महिने पूर्ण झाले असून अद्यापही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याची खंत व्यक्त करत शहरातील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या शहरातील रिक्षा-टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.
नाशिक शहरातील रिक्षा, टॅक्सीचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत रिक्षा आणि टॅक्सी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय श्रमिक रिक्षा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. शहरातील रिक्षा, टॅक्सीचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे श्रमिक सेनेचे महानगरप्रमुख मामासाहेब राजवाडे यांनी म्हटले आहे. परिणामी प्रलंबित व इतर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमिक सेनेचे संस्थापक सुनील बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्याध्यक्ष भगवान पाठक, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, बाबासाहेब राजवाडे, शंकर बागुल, नवाज सय्यद, राजेंद्र वाघले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक- मालक आंदोलन केले.
.jpeg)
.jpeg)