निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात बॅनरवर कारवाई

 


 १४ हजार ५५९ बॅनर हटवले

पेण : जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करताना, आचारसंहिता लागू झाल्यानंतर चार दिवसांत शासकीय जागेतील, सार्वजनिक मालमत्ता तसेच खासगी जागेवरील जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बैनर व ध्वज असे एकूण१४ हजार ५५९ हटविण्यात आले असल्याची माहिती आचार संहिता पथकाने दिली आहे. 

येत्या ७ मे रोजी रायगड लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शासकीय तसेच खासगी जागांवर लावलेले १४ हजार ५५९ जाहिरातींचे बॅनर, फलक हटविण्यात आले आहेत.  ३२-रायगड लोकसभा मतदार संघातील पेण मतदार संघात २ हजार ७१७, अलिबाग १ हजार ०९, श्रीवर्धन २ हजार ४८२, महाड १ हजार ४७९ तर ३३-मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल २ हजार ७८३. कर्जत ३ हजार ६८७ तर उरणमध्ये ४०२ पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्पलेट हटविण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून निवडणूक आयोगाच्या निदेशांप्रमाणे सर्व कार्यवाही सुरु असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post