सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 


अलिबाग (धनंजय कवठेकर) :  गेली ५ वर्ष सुरू असलेली चोंढी येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची परंपरा सक्षम एज्युकेशन सोसायटीने यावर्षी देखील कायम ठेवत सुमारे ६८ विद्यार्थ्यांना शनिवारी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. 





सदर वाटप किहीम ग्रुप ग्राम पंचायतीचे विद्यमान सदस्य श्री गणेश भोईर यांच्या आर्थिक मदतीतून करण्यात आले. चोंढी अंगणवाडी ते इयत्ता सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी शैक्षणिक साहित्यासोबत खाऊचे वाटप देखील करण्यात आले. 


याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया काळे यांनी प्रास्ताविक सादर केले. तर शार्दूल काठे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना याच शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमासाठी सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे  गणेश भोईर, प्रसन्न ठाकूर, किसन गायकवाड, राम कदम, परेश सुर्वे, वासुदेव आमले आदी सदस्य उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post