ई-गव्हर्नन्स क्षेत्रात अमरावती महानगरपालिकेचा अभिमान

 


अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा गौरव करण्यात आला असून, ई-गव्हर्नन्स क्षेत्रात अमरावती महानगरपालिकेने राज्यात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांमधून १७९.५० गुणांसह अमरावती महानगरपालिकेने पाचवा क्रमांक पटकावत विदर्भ- मराठवाड्यात मानाचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे या विभागातून अशी कामगिरी करणारी अमरावती ही एकमेव महानगरपालिका ठरली आहे.

“माय अमरावती” चॅटबॉट, ब्लॉकचेन, जीआयएस तसेच कूल रूफ यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे नागरिकांना सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होत आहेत.

मर्यादित साधनसामग्री असूनही मोठ्या शहरांना टक्कर देत मिळवलेले हे यश भविष्यातील स्मार्ट प्रशासनासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


#amravatimunicipalcorporation #amravati

Post a Comment

Previous Post Next Post