नवीन वर्ष असणार प्रकल्पपूर्तीचे

 

 


  • एमएमआरडीए करणार वर्ष २०२३ मध्ये महत्त्वाच्या प्रकल्पांची पूर्तता

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई महानगर प्रदेशात वाहतुक व्यवस्था सुधारण्याच्या अनुषंगाने विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे २०२३ मध्ये लोकार्पण केले जाईल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), मुंबई मेट्रो मार्ग २अ- आणि मेट्रो मार्ग ७ चा दुसरा टप्पा, ऐरोली कटाई नाका रस्ता आणि बोगदा प्रकल्प, सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, कोपरी पूल, छेडानगर उड्डाणपूल क्र. २, सांताक्रुझ चेंबुर जोडरस्ता विस्तार प्रकल्प इ. पूर्णत्वाच्या दिशेने प्रगतीपथावर असून ते नवीन वर्षात लोकांसाठी टप्प्याटप्प्याने खुले करण्यात येतील. 

प्रकल्पांची सद्यस्थिती आणि नियोजित कालावधी

1) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) - 

प्रकल्पामुळे मुंबई मुख्यभुमिसोबत जोडला जाणार आहे त्यामुळे मुंबई आता बेटांचे शहर म्हणून ओळखले जाणार नाही आहे. प्रकल्पामध्ये पॅकेज १,२,३ मध्ये संरक्षण कठडा उभारण्याचे काम प्रगतीपथावर. या कठड्याचे बांधकाम असे करण्यात आले आहे की ज्याच्यामुळे बाह्य सुंदरतादेखील पहाता येईल. प्रकल्पाच्या चौथ्या पॅकेज मध्ये इंटेलीजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम (ITS) अंतर्गत वाहतूक नियंत्रण, टोल मॅनेजमेंट सिस्टीम, इलेक्ट्रिकल कामे, हायवे आणि ब्रिज स्ट्रीटलाइटिंग सिस्टीम, टोल प्लाझाचे बांधकाम आणि कमांड कंट्रोल सेंटरसह प्रशासकीय इमारतींची स्थापनेची कामे प्रगतीपथावर आहेत. एकूण ३+३ मार्गिका असलेल्या २२ किमीच्या या प्रकल्पाद्वारे मुंबई आणि नवीमुंबई दरम्यानचा प्रवास केवळ १५ मिनिटांत शक्य होणार आहे. ज्यामुळे प्रकल्पाचे ९० टक्के कामे पूर्ण झाली असून २०२३ च्या नोव्हेंबरपूर्वी वाहतुकीस खुला केला जाईल. ज्यामुळे रोजगार निर्मितीस चालना मिळेल. 

२) मेट्रो मार्ग २अ आणि ७ टप्पा दुसरा टप्पा -  

मेट्रो मार्ग २अ आणि ७ च्या दुसऱ्या टप्प्याची सर्व कामे पूर्ण झाली असून प्रतीक्षा आहे ती सीएमआरएस प्रमाणपत्राची, प्रमाणपत्र मिळताच तो नागरिकांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीस तो लोकार्पित करण्यात येईल. ज्यामुळे त्यांच्या प्रवासाच्या वेळेची आणि इंधनाची बचत होईल. 

३) सूर्या प्रादेशिक पाणीपुरठा योजना

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून वसई-विरार शहर महानगरपालिकेस नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामांची प्रगती साधारणतः९२ टक्के पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्याची साधारणतः ७० % कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातून मिरा - भाईंदर महानगरपालिकेस पाणीपुरवठा केला जाईल. 

४) ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्प -

 विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प

ऐरोली कटाई नाका बोगद्या सह उन्नत मार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर असून प्रकल्पातील उन्नत मार्गाचे ८८% काम पूर्ण झालेले आहे. सदर प्रकल्पा अंतर्गत एकूण १११ पिअर्सपैकी १११ पूर्ण झाले आहेत, १११ पियर कॅप पैकी १०१ पूर्ण झाले आहेत, तर डेक स्लॅब १०५ स्पॅनपैकी ८३ स्पॅनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पारसिक बोगद्याचे ६६% काम पूर्ण झालेले आहे. सदर प्रकल्पांअतर्गत दोन बोगदयांची (Twin Tunnel) प्रत्येकी लांबी १.६९ कि.मी. आहे.

५) कोपरी पूल, ठाणे -

मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने २+२पथ मर्गिकेच्या पुलाचे ४+४ असे अपग्रेड केले जात आहे. रेल्वे मार्गावरील पुलाचा भाग एमएमआरडीएच्या निधीतून रेल्वेने बांधला आहे. तर एमएमआरडीए दोन्ही बाजूंना सिमेंट काँक्रीटमध्ये अप्रोच बांधत आहे. एमएमआरडीएने काँक्रिटीकरणाचा शेवटचा भाग पूर्ण केला आहे. रस्ता दुभाजक, विद्युतीकरण, रस्ता चिन्हांकित करणे, चिन्हे इ. विविध कामे प्रगतीपथावर आहेत. रेल्वेचे काम पूर्ण होताच ते वाहतुकीसाठी खुले केले जाईल प्रकल्पामुळे द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना फायदा होईल तसेच मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होईल.

६) पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर (पूर्व) येथे वाहतूक सुधार- 

आजतागायत ७४% काम पूर्ण करण्यात आले आहे व उर्वरीत काम प्रगतीपथावर आहे.

७) विस्तारीत सांताक्रूज-चेंबूर जोडरस्ता प्रकल्प* - प्रकल्पाच्या पहिल्या भागात कुर्ला ते वाकोला दरम्यान उन्नत मार्ग प्रगतीपथावर असून त्याची ८०% प्रगती पूर्ण झाली आहे. या भागातील एमटीएनएल आर्म (बीकेसी) व पोलीस ट्रेनिंग सेंटर (हयात हॉटेल ते रजाक जंक्शन) पर्यंत एक मार्गिका नवीन वर्षाच्या सुरुवातीस वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या भागात भारत डायमंड बोर्स ते वाकोला जंक्शन दरम्यान काम प्रगतीपथावर आहे, आजतागायत या टप्प्याची ८६% स्थापत्य कामे पूर्ण करण्यात आले आहेत व उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहे.

*मेट्रो प्रकल्पांची सद्यस्थिती*

•मेट्रो २ब - २९% स्थापत्य कामे पूर्ण 

•मेट्रो ४ - ४१.४३% स्थापत्य कामे पूर्ण 

•मेट्रो ४अ- ४५% स्थापत्य कामे पूर्ण 

•मेट्रो ५ टप्पा१ - ७२% स्थापत्य कामे पूर्ण 

•मेट्रो ६- ६३% स्थापत्य कामे पूर्ण 

•मेट्रो ९ - ४७% स्थापत्य कामे पूर्ण 

•मेट्रो १०- साधारण सल्लागारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

•मेट्रो ११- साधारण सल्लागारांची नियुक्ती करण्याचे काम प्रगतपथावर आहे. 

*वर्ष२०२३ मध्ये काम सुरु होणारे नवीन प्रकल्प*

• वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रकल्प

• धारावी पुनर्विकास प्रकल्प

• पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत पर्यंतच्या ६.३० कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम करणे.

• बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्गाचे (ठाणे कोस्टल

• छेडानगर-घाटकोपर ते ठाणे पर्यंत पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण रोड) बांधकाम करणे.

• आत्माराम पाटील चौक (खारेगाव टोलनाका ते कळवा नाका) रस्त्याचे बांधकाम

• तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ ठाणे बेलापूर रस्ता ते एपीएमसी मार्केटपर्यंत रेल्वे ओलांडणी पुलाचे (ROB) बांधकाम

• बोरीवली-गोराई रस्त्यावर, गोराई खाडीवर पूल बांधणे

राज्य शासनाच्या मदतीने एमएमआरडीएची संपूर्ण टीम, मुंबई महानगराच्या सर्वांगीण विकासा करिता अहोरात्र मेहनत घेत आहेत. २०२३ हे वर्ष एमएमआरडीए च्या प्रकल्पांच्या दृष्टीने प्रकल्पूर्तीच असल्यानं महत्त्वाचे असणार आहे. कारण हे प्रकल्प पूर्ण होताच, मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पांचा एकत्रित फायदा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक होईल.

 एस. व्ही.आर. श्रीनिवास,

आयुक्त, एमएमआरडीए महानगर

Post a Comment

Previous Post Next Post