क्रिश गुरबक्षनी, स्पर्श फेरवानी आणि इशप्रीत सिंगही क्वार्टरफायनलमध्ये

एनएससीआय बॉल्कलाइन स्नूकर स्पर्धा 

मुंबई : रेहान राझमी याच्यासह क्रिश गुरबक्षनीस्पर्श फेरवानी आणि इशप्रीत सिंग चढ्ढा यांनी मुंबईचा झेंडा उंच फडकवत ठेवताना 13 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एनएससीआय बॉल्कलाइन स्नूकर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व  फेरीत प्रवेश केलात्यांच्यापूर्वी गतविजेत्या पीएसपीबीच्या सौरव कोठारीसह अनुभवी आदित्य मेहता तसेच मुंबईचा शाबाझ खान आणि लक्ष्मण रावत यांनी अंतिम 8 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे.

राऊंड ऑफ 16 फेरीत शांत आणि संयमी गुरबक्षनी याने पिछाडी भरून काढतानाच शेवटच्या तीन फ्रेम्स जिंकून राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियन रेल्वेच्या कमल चावला याच्यावर 5-4 (78-19, 8-129 (52,65), 70-22, 8-126 (126), 43-65, 8--८८(६६असा सनसनाटी विजय मिळविलादुसर्या टेबलवर राझमी याने तीन शतकी ब्रेक मारताना सर्वोत्तम फॉर्म राखत पीएसपीबीच्या देवेंद्र जोशीवर 5-1 (60-30, 137-0, 101-0, 23-76, 87-0, 113-0) अशी सहज मात केली.

भारताच्या दुसर्या क्रमांकाच्या क्रमांकाच्या स्पर्श फेरवानीने पारस गुप्ताला 5-1 (98-23, 76-39, 65-18, 58-70, 80-24 आणि 67-57)  असा बाहेरचा रस्ता दाखवलातिसर्या क्रमांकावर असलेल्या इशप्रीत सिंग चढ्ढा याने त्याचा सहकारी राहुल सचदेवचा 5-2 (94-0, 74-44, 0-94, 57-65, 59-50, 71-25, 70-0) असा पराभव केला.क्रिश गुरबक्षनी, स्पर्श फेरवानी आणि इशप्रीत सिंगही क्वार्टरफायनलमध्ये


- एनएससीआय बॉल्कलाइन स्नूकर स्पर्धा 


मुंबई, 13 जानेवारी 2023 : रेहान राझमी याच्यासह क्रिश गुरबक्षनी, स्पर्श फेरवानी आणि इशप्रीत सिंग चढ्ढा यांनी मुंबईचा झेंडा उंच फडकवत ठेवताना 13 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एनएससीआय बॉल्कलाइन स्नूकर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांच्यापूर्वी गतविजेत्या पीएसपीबीच्या सौरव कोठारीसह अनुभवी आदित्य मेहता तसेच मुंबईचा शाबाझ खान आणि लक्ष्मण रावत यांनी अंतिम 8 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे.


राऊंड ऑफ 16 फेरीत शांत आणि संयमी गुरबक्षनी याने पिछाडी भरून काढतानाच शेवटच्या तीन फ्रेम्स जिंकून राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियन रेल्वेच्या कमल चावला याच्यावर 5-4 (78-19, 8-129 (52,65), 70-22, 8-126 (126), 43-65, 8--८८(६६) असा सनसनाटी विजय मिळविला. दुसर्‍या टेबलवर राझमी याने तीन शतकी ब्रेक मारताना सर्वोत्तम फॉर्म राखत पीएसपीबीच्या देवेंद्र जोशीवर 5-1 (60-30, 137-0, 101-0, 23-76, 87-0, 113-0) अशी सहज मात केली.


भारताच्या दुसर्‍या क्रमांकाच्या क्रमांकाच्या स्पर्श फेरवानीने पारस गुप्ताला 5-1 (98-23, 76-39, 65-18, 58-70, 80-24 आणि 67-57) असा बाहेरचा रस्ता दाखवला. तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या इशप्रीत सिंग चढ्ढा याने त्याचा सहकारी राहुल सचदेवचा 5-2 (94-0, 74-44, 0-94, 57-65, 59-50, 71-25, 70-0) असा पराभव केला.

Post a Comment

Previous Post Next Post