मंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा
डोंबिवली (शंकर जाधव ) : डोंबिवलीजवळील एमआयडीसीजवळील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलट स्फ़ोट झाल्याने शहर हादरले. या घटनेत १५ कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त हाती आले. जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मंत्री उदय सामंत हे दाखल झाले असून त्यांनी घटनेची माहिती घेतली. या दुर्घटनेत तीन जणाचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
डोंबिवलीतील केमिकल कंपन्या लवकरच दुसरीकडे हलविण्यात येतील. या संदर्भात संपूर्ण प्रकिया झालेली आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही. येत्या ४ जूननंतर अंमलबजावणी प्रक्रियेला सुरुवात होईल असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.