चिखलात लोळून मुख्याध्यापकाची प्रशासनाविरोधात आक्रोश

 डोंबिवली : नागरिकांना वेळेवर सुविधा मिळवून देणे हे प्रशासनाचे काम असताना सुविधा पुरविण्यास विलंब झाल्यास जनता नाराजी व्यक्त करत असते. अशाच एका संतापलेल्या मुख्याध्यापकाने कल्याणात चक्क रस्त्यातील चिखलात लोळून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. कल्याण- मुरबाड नगर महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे असे मुख्याध्यापकाने सांगितले.

  मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्गाचे आम म्हारळ ते पाचवा मैल या भागात कासवाच्या चालीप्रमाणे संथपाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एका लहान मुलगा येथील रस्त्याच्या खड्ड्यात पडून किरकोळ जखमी झाला होता.या घटनेने संतप्त झालेले मुख्याध्यापक यावर नाराजी व्यक्त केली होती. याआधी स्थानिक नागरीक आणि शिक्षक वर्गानी आंदोलन केले होते. रखडलेल्या या कामामुळे वाहनचालकांच्या जीव धोक्यात असून दररोज अपघात होत असतात. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का ? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी यावेळी उपस्थित केला आहे.अखेर एका मुख्याध्यापकाने वैतागून चक्क रस्त्यामधील चिखलात लोळून अनोखे आंदोलन करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस सद ठिकाणी आले.

दरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता एका सामान्य नागरिक प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत आंदोलन करत असेल  त अश्या वेळी प्रशासनाने याची वेळेव दाखल घेणे आवश्यक असते असे या घटनेवरून दिसून येते.



Post a Comment

Previous Post Next Post