नवयान महाजलसा प्रबोधनपर गीत-संगीत कार्यक्रम

डोंबिवली / शंकर जाधव :   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती औचित्य साधून, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले या महामानवांची संयुक्तिक जयंती कासा रिओ, लोढा पलावा सिटी, डोंबिवली पूर्व येथे तथागत बौद्ध सामाजिक संस्था(TBSS) मार्फत मोठ्या हर्ष-उल्हासित वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त मुलांच्या विविध स्पर्धा आणि शाहीर शितल साठे - सचिन माळी यांचा नवयान महाजलसा या प्रबोधनपर गीत-संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील लोकांनी सहभाग घेतला. 

कार्यक्रमाच्या ठिकाणी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, कासा रिओ फेडरेशन, कासा बेला गोल्ड असोसिएशन तसेच विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील पदाधिकारी यांचे स्वागत बुके नव्हे बुक या अभिनव उपक्रमांतर्गत भारतीय संविधानाची प्रत देवून करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post