डोंबिवली / शंकर जाधव : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या डोंबिवली शाखेतील विकास अधिकारी उमेश चव्हाण यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ या वर्षात ठाणे विभागात सात कोटी ७२लाख नवीन सिंगल प्रीमियमचा व्यवसाय देऊन प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे,
उमेश चव्हाण ह्यांनी यावर्षी डोंबिवली शाखेमध्येही पॉलिसी व प्रीमियम मध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे. डोंबिवली शाखे मध्ये मागील सलग २४ वर्ष पॉलिसीच्या आधारवर ते प्रथम क्रमांकावर आहेत.
ते एक नामवंत विकास अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या यशामध्ये विमा प्रतिनिधी विनय तिरोडकर, विजय महालकर, जितेंद्र टोकरे, विद्या काळे, योगेश्वर शर्मा, अतुल सावंत, अमित पारकर, प्रविण दिवटे ह्या विमाप्रतिनिधींचा सिहांचा वाटा आहे.या कार्याबद्दल उमेश चव्हाण यांचा वरिष्ठ शाखा प्रबंधक विजयकुमार कोरडे व सहाय्यक शाखा प्रबंधक निलेश खानदट यांनी शाखेतर्फे त्यांचा मोठा सन्मान केला.
उमेश चव्हाण ह्यांनी जीवन आधार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात ही आपला ठसा उमटवला आहे. रोटरी आंतरराष्ट्रीय संस्था ठाणे जिल्हा यामध्ये उमेश चव्हाण खूप सक्रिय असून अध्यक्ष या पदापासून ते पुढच्या रोटरी वर्षी जिल्हा मुख्य कॉर्डिनेटर या पदावर कार्य करणार आहेत. रोटरी व इतर सामाजिक संस्थेमार्फत उमेश चव्हाण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यशाबद्दल चव्हाण यांचे नियोजित रोटरी जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी, जिल्हा प्रांतपाल बी.एम.सिवराज व रोटरी कौन्सिलर व विकास अधिकारी डॉ. सर्जेराव सावंत व इतर अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
