डोंबिवलीतील शिवसेना ठाकरे गटाची एकनिष्ठ दहीहंडीत उत्सव साजरा

 

डोंबिवली ( शंकर जाधव )  :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन समोरील रेती भवन इमारती जवळ एकनिष्ठ दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

येथील दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती. सलामी दिलेल्या गोविंदा पथकांना रोख रक्कम आणि ट्रॉफी असे बक्षिसे वाटप करण्यात आली. 

  शिवसेना डोंबिवली पश्चिम शहर शाखा यांच्या तर्फे संकल्प मित्र मंडळाच्या माध्यमातून ही दहीहंडी उभारली गेली होती.प्रथम पारितोषक ३३ हजार ३३३ तर  द्वितीय बक्षिस २२ हजार २२२ रुपये असे आकर्षक बक्षिस आणि ट्रॉफी असे बक्षिसे गोविंदा पथकांसाठी होती.कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांच्या हस्ते सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना बक्षिसे देण्यात आले. 

विधानसभा शहर संघटक प्रकाश तेलगोटे, संजय पाटील, हेमंत म्हात्रे, युवा उपअधिकारी ऋतूनिल पावसकर, विभागप्रमुख नितीन पवार , शाखा प्रमुख राजेश पाटील यांच्या पुढाकाराने लावलेल्या या दहीहंडी उत्सवात उपजिल्हा प्रमुख तात्या माने, तानाजी मालुसरे,शहरप्रमुख विवेक खामकर ,शहर संघटक किरण मोंडकर ,मंगला सुळे,श्याम चौगुले ,हेमंत म्हात्रे, रोहित म्हात्रे,सतीश मोडक, प्रमोद कांबळे, मिलिंद दूधगावकर,प्राजक्ता दळवी, प्रियंका विचारे , शामल आचरेकर,सानिका खाडे,संजना राणे, संध्या शिर्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post