डोंबिवलीजवळील गोळवली परिसरात भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग

 

दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील टाटा पावर गोळवली येथील देशमुख होम्स परिसरात असलेल्या भंगाराच्या गोडाऊनला आग लगल्याची घटना गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.  या ठिकाणी पत्रे ठोकून भंगाराचे गोडाऊन उभे केलेहोते. या गोडाऊनमध्ये कापडाचा चिंध्या , प्लास्टिकच्या बॉटल ,पिशव्या ,लाकडी सामान  मोठ्या प्रमाणात असल्याने  आगीने रौद्र रूप धारण केले होते.

या दुर्घटनेत  सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही .आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या सात ते आठ गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.



Post a Comment

Previous Post Next Post