मराठा आरक्षण आंदोलनात भराडी देवी सेवा मंडळामार्फत बिस्किटांचे वाटप





दिवा / आरती परब :  एक मराठा लाख मराठा या घोषणेसह मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आमरण उपोषणावर बसले असून, त्यांना राज्यभरातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. लाखो नागरिक उपोषण स्थळी पोहोचत असताना दिव्यातील भराडी देवी सेवा मंडळ, दिवा- ठाणे तर्फे रविवारी ३१ ऑगस्टला सकल मराठा बांधवांसाठी बिस्किटे वाटण्यात आली.


भराडी देवी सेवा मंडळ, दिवा ठाणेचे अध्यक्ष रुपेश दुखंडे, अमोल दळवी, संतोष साटम व चेतन परब यांनी उपस्थितीत नागरिकांना बिस्किटे
 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स जवळ वाटली. या उपक्रमामुळे दिव्यातील मराठा बांधवांनी आंदोलनाला आपला ठाम पाठिंबा दर्शवला असून, जनतेत चळवळीबद्दल उत्साह व जागरूकता निर्माण होत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post