डोंबिवली ( शंकर जाधव ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार २१ तारखेला डोंबिवलीत रूट मार्च काढण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे, मानपाडा पोलीस ठाणे, टिळकनगर पोलीस ठाणे, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासोबत पोलीस कर्मचारी यांनी डोंबिवली जिमखाना , शेलार चौक, टिळक चौक, इंद्र चौक डोंबिवली पूर्व ते डोंबिवली पश्चिम कोपर ब्रिज सम्राट चौक, मच्छी मार्केट होऊन रेल्वे मैदान या ठिकाणी रूट मार्च करण्यात आले.