डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोकणातील शिमगा प्रसिद्ध असून डोंबिवलीतील चाकरमान्यांनी याच पद्धतीने शिमगा साजरा केला. पश्चिमेकडील गरीबाचा वाडा येथील साईनगर रहिवाशी संघाने शिमगात्सव साजरा करताना श्री देव भौम भजन मंडळाचे आयोजन केले होते.
भजनी मंडळात आबा सावंत ( राधा ) , रुपेश लाड ( कृष्ण ), दिनेश सडवेलकर ( हनुमान ), महेश सडवेलकर ( भूत ) आणि हेमंत मेस्ञी, मनोज वंजारे,विठोबा आसोलकर,महेश केरकर, नारायण परब,मंगेश मुळीक, विकास मुळीक, सहदेव खानोलकर,प्रसाद खानोलकर, प्रसाद सडवेलकर, देवेंद्र सडवेलकर, सत्यवान मांजरेकर, सुधीर गावडे यांनी संगीत साथ दिली.