"माझं कुंकू, माझा देश" आंदोलनातून पाकिस्तानविरोधी हल्लाबोल
ठाणे : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटून गेले असतानाही मोदी–शहा सरकार पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ठाण्यात जोरदार आंदोलन केले.
"शहीदो के सन्मान में, देशभक्त उतरे मैदान में – क्रिकेट नाही, युद्ध खेळू", "पाकिस्तान मुर्दाबाद" अशा घोषणांनी ठाणे शहर दणाणून गेले. केंद्र सरकारने क्रिकेट सामना खेळवून शहीदांचा अपमान केला असल्याचा आरोप करत संतप्त शिवसैनिकांनी सिंधूर पाठवून पहलगाम हल्ल्याची आठवण पंतप्रधान व गृहमंत्र्यांना करून दिली.
या आंदोलनाचा भाग म्हणून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने "माझं कुंकू, माझा देश" हे राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात आले. घराघरातून सिंधूर जमा करून पाकिस्तानविरोधात प्रतिकात्मक संदेश देण्यात आला.
शिवसेना चंदनवाडी शाखा येथे झालेल्या या आंदोलनात माजी खासदार राजन चव्हाण, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिश गाढवे, जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, उपजिल्हा संघटिका आकाश राणे, महेश्वरी तरे, ज्योती कोळी, प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, विद्या कदम, स्मिता इंदुलकर, अनिता प्रभू, पुष्पलता भानुषाली, योगिता नाईक, निलीमा शिंदे, माधुरी ठाकरे, स्नेहल सावंत, ज्योती पाटील, शोभा गरांडे, नंदिनी विचारे, अंकिता पाटील आदी पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
तसेच ठाणे उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी, सुनील पाटील, विजय देसाई, प्रदीप शिंदे, सचिन पाटील, प्रकाश मोहिते, विजय कदम, सचिन चव्हाण, वसंत गव्हाळे, राजेंद्र महाडिक, चंद्रकांत विधाटे, संजय ब्रीद यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा लाभला. पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने रद्द करून शहीदांचा सन्मान करावा, अशी मागणी यावेळी शिवसेना (उभठा) पदाधिकाऱ्यांनी केली.



