पुन्हा नागांव मार्गे एसटी सेवा सुरू करण्याची मागणी

 


सरपंच हर्षदा मयेकर यांचे अलिबाग एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन

 अलिबाग (प्रतिनिधी) : रायवाडी रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याने बंद करण्यात आलेल्या एस टी बस सेवा पुन्हा नागाव मार्गे सुरू करण्याची मागणी नागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर व माजी सरपंच तथा सदस्य निखिल मयेकर यांनी अलिबाग एसटी आगार व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे. याबाबत आभार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत नागांव हद्दीतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी व ग्रामस्थ कामानिमित्त एस टी बसच्या माध्यमातून प्रवास करतात. परंतु नागांव रस्त्यांने जाणाऱ्या एसटी बसेस रायवाडी येथील रस्त्याचे काम सुरू असल्याने पाल्हे बायपास रस्त्याने वळवण्यात आलेल्या आहेत त्यामळे विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणवर गैरसोय होत आहे.

सद्यस्थितीमध्ये रायवाडी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आलेला आहे व साईडपट्ट भरण्याचे काम सरू आहे. त्यामळे विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ज्या बसेस चालू आहेत त्यांना नागांव मार्गे जाण्याचे निर्देश तातडीने देण्यात यावे, अशी मागणी हर्षदा व निखिल मयेक यांनी केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post