CBSE : सीबीएसईच्या ३ आणि ६ वीच्या अभ्यासक्रमात बदल

 


नवी दिल्ली :  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये इयत्ता तिसरी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र इतर वर्गांचा अभ्यासक्रम आहे तोच राहणार आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही.  इयत्ता पहिली आणि दुसरीची पाठ्यपुस्तके गेल्या वर्षीच बदलली आहेत. याबाबत सीबीएसईने सर्व शाळांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. सीबीएसई अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन सत्र १ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

 या प्रकरणी सीबीएसईने पत्रात म्हटले आहे की एनसीईआरटीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) कळवले आहे की सध्या इयत्ता तिसरी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत आणि ती लवकरच प्रकाशित केली जातील.

CBSE शैक्षणिक संचालक जोसेफ इमॅन्युएल यांनी सांगितले की, शाळांना २०२३ पर्यंत NCERT ने प्रकाशित केलेल्या पाठ्यपुस्तकांच्या जागी हा नवीन अभ्यासक्रम आणि इयत्ता तिसरी आणि सहावीसाठी पाठ्यपुस्तकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहे. त्याचबरोबर मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल होणार नाही. 

सीबीएसई मार्गदर्शक तत्त्वांबाबत, NCERT (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) ने कळवले आहे की इयत्ता तिसरी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत आणि लवकरच प्रकाशित केली जातील. तसेच सहाव्या वर्गासाठी ब्रिज कोर्स आणि तिसरीसाठी संक्षिप्त मार्गदर्शक तत्त्वे NCERT द्वारे विकसित केली जात आहेत.  ही संसाधने NCERT कडून प्राप्त झाल्यानंतर सर्व शाळांमध्ये ऑनलाइन प्रसारित केली जातील असे सीबीएसईने म्हटले आहे.

१८ वर्षांनंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) च्या पुनरावृत्तीमध्ये, शिक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी बदल अधिसूचित केले होते. एनसीएफने १९७५, १९८८, २००० आणि २००५ मध्ये चार सुधारणा केल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून परिषद शालेय शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF-SE) २०२३ च्या अनुषंगाने नवीन शालेय पाठ्यपुस्तके तयार करण्याच्या प्रक्रियेत करण्यात आलाा आहे.


Post a Comment

Previous Post Next Post