डोंबिवली ( शंकर जाधव ) : रेल्वे अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.यात रेल्वेतून पडून एकाचा , एका तरुणाचा रेल्वेचा खांब लागून आणि धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यातील एका अपघातांची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तर दोन रेल्वे अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ तारखेला भिवंडीत राहणारा सुनील चव्हाण हा आई बरोबर रेल्वेने प्रवास करत होता. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेन जात असताना ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान सुनील दरवाज्याजजवळ उभे राहून प्रवास करत असताना रेल्वेचा खांब लागल्याने लोकल मधून पडून जखमी झाला. उपचारदरम्यान त्याचा शुक्रवार १७ मी रोजी मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेत गुरुवारी १६ तारखेला विठ्ठलवाडी ते उल्हासनगर रेल्वे स्थानका दरम्यान सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर मधील ५५ वर्षीय पदमन्ना पिरन्ना पुजारी यांचा गर्दीच्या रेल्वेतून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तिसऱ्या घटनेत दिवा ते कोपर दरम्यान रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या ५३ वर्षीय इसमाचा अज्ञात लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. अद्याप त्याची ओळख पडली नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
.jpeg)