डॉ. श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार!

 दिव्यातील इस्कॉन संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केला विश्वास!

दिवा, (आरती मुळीक परब) : कल्याण लोकसभेत इस्कॉन (Escon) संस्थेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ( dr. Shreekant shinde)  यांना तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचा विश्वास दिव्यातील संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केला. कल्याण लोकसभेतील दिवा येथे झालेल्या कार्यक्रमात इस्कॉन संस्थेच्या ५०० पेक्षा जास्त सदस्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

कल्याण लोकसभेतील कळवा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात इस्कॉन संस्थेचे मोठे कार्य आहे. या भागात संस्थेचे मोठ्या प्रमाणात सदस्य असून त्यांच्याकडून सनातन हिंदू धर्माचा प्रचार- प्रसार केला जातो. या संस्थेच्या वतीने आज दिवा येथे आयोजित कार्यक्रमात कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी इस्कॉन संस्थेचे आभार मानले. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे सांगत इस्कॉन संस्थेचे सदस्य पूर्ण ताकदीने धर्म पुढे घेऊन जाण्याचे काम करतात. जगभरात इस्कॉनची मंदिरे असून त्या माध्यमातून जगभरात हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार केला जातोय. येणाऱ्या पिढीला आपला इतिहास तुमच्यामुळे कळणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहायला ५०० वर्ष लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आणि हे मंदिर उभे राहिले. हे मंदिर राष्ट्रमंदिर म्हणून येणाऱ्या पिढ्यांना आपल्या इतिहासाची साक्ष देत राहील, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच कल्याण लोकसभेत इस्कॉनचे मंदिर उभारावे, यासाठीही शुभेच्छा दिल्या. तुमच्या एका मताची मोठी ताकद असून २०१४ साली आपल्या मतामुळेच देशात बदल झाला आणि त्यानंतर गेल्या १० वर्षात देश बदलल्याचे म्हणत येत्या २० मे रोजी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

याप्रसंगी इस्कॉन हरे कृष्णा संस्थेचे केशवचंद्र प्रभू, सत्यनारायण दास प्रभू, अनिश प्रभू, अस्मिता माताजी, रमा सिंग जी, शिवसेना कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, शैलेश पाटील, अमर पाटील, दीपक जाधव, माजी नगरसेविका सौ. दिपाली उमेश भगत तर विभाग प्रमुख उमेश भगत, निलेश पाटील, गणेश मुंडे, गुरुनाथ पाटील, रंदीप मढवी, विनोद मढवी, आदेश भगत, समीर पाटील, भालचंद्र भगत, शशिकांत पाटील, सूर्यकांत कदम, राहुल शिंदे यांच्यासह कळवा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ परिसरातील इस्कॉन संस्थेचे सदस्य आणि भाविक उपस्थित होते.)- कल्याण लोकसभेत इस्कॉन संस्थेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचा विश्वास दिव्यातील संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केला. कल्याण लोकसभेतील दिवा येथे झालेल्या कार्यक्रमात इस्कॉन संस्थेच्या ५०० पेक्षा जास्त सदस्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

कल्याण लोकसभेतील कळवा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात इस्कॉन संस्थेचे मोठे कार्य आहे. या भागात संस्थेचे मोठ्या प्रमाणात सदस्य असून त्यांच्याकडून सनातन हिंदू धर्माचा प्रचार- प्रसार केला जातो. या संस्थेच्या वतीने आज दिवा येथे आयोजित कार्यक्रमात कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी इस्कॉन संस्थेचे आभार मानले. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे सांगत इस्कॉन संस्थेचे सदस्य पूर्ण ताकदीने धर्म पुढे घेऊन जाण्याचे काम करतात. जगभरात इस्कॉनची मंदिरे असून त्या माध्यमातून जगभरात हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार केला जातोय. येणाऱ्या पिढीला आपला इतिहास तुमच्यामुळे कळणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहायला ५०० वर्ष लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आणि हे मंदिर उभे राहिले. हे मंदिर राष्ट्रमंदिर म्हणून येणाऱ्या पिढ्यांना आपल्या इतिहासाची साक्ष देत राहील, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच कल्याण लोकसभेत इस्कॉनचे मंदिर उभारावे, यासाठीही शुभेच्छा दिल्या. तुमच्या एका मताची मोठी ताकद असून २०१४ साली आपल्या मतामुळेच देशात बदल झाला आणि त्यानंतर गेल्या १० वर्षात देश बदलल्याचे म्हणत येत्या २० मे रोजी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

याप्रसंगी इस्कॉन हरे कृष्णा संस्थेचे केशवचंद्र प्रभू, सत्यनारायण दास प्रभू, अनिश प्रभू, अस्मिता माताजी, रमा सिंग जी, शिवसेना कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, शैलेश पाटील, अमर पाटील, दीपक जाधव, माजी नगरसेविका दिपाली उमेश भगत तर विभाग प्रमुख उमेश भगत, निलेश पाटील, गणेश मुंडे, गुरुनाथ पाटील, रंदीप मढवी, विनोद मढवी, आदेश भगत, समीर पाटील, भालचंद्र भगत, शशिकांत पाटील, सूर्यकांत कदम, राहुल शिंदे यांच्यासह कळवा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ परिसरातील इस्कॉन संस्थेचे सदस्य आणि भाविक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post