सेंट्रल - हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

 


मुंबई: मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. १९.०५.२०२४ (रविवार) रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी  उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या जलद गाड्या पुन्हा मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि पुन्हा माटुंग्यापासून जलद मार्गावर वळवल्या जातील.



अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डााऊ हार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या कालावधीतल ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.



मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post