जी.एम. प्रीमियर लीग सामने डोंबिवली येथे संपन्न


दिवा,  (आरती मुळीक परब) :  डोंबिवलीमधील जी.एम क्रिकेट अकॅडमीच्या वतीने दरवर्षी जी. एम प्रीमियर लीग क्रिकेट सामने घेतले जातात. याही वर्षी मुख्य प्रशिक्षक गोपाल श्रीयान यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारखान पाडा, गणेश घाट मैदान, डोंबिवली पश्चिम येथे जी. एम. पी. एल क्रिकेट सामने आयोजित केले होते. या जी.एम.पी.एल क्रिकेट सामन्याचे वर्ष सहावे आहे. 

या क्रिकेट सामन्यांमध्ये १० वर्षे, १२ वर्षे व १४ वर्षे च्या आतील वयोगटातील मुलांसाठी क्रिकेट सामने आयोजित केले गेले होते. गेले आठवडाभर हे सामने बघायला मिळाले. यामध्ये १० वयोगटातील मुलांमध्ये जी.एम. लिटिल बॉईज व जी.एम. लिटिल स्टार हे दोन संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचले व अखेर जी.एम. लिटिल स्टार हा संघ विजेता घोषित ठरला. तर १२ वयोगटातील मुलांमध्ये जी.एम. इंडियन व जी.एम. रॉयल्स हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले. या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळाली. 

यामध्ये जी.एम. रॉयल संघ विजेता ठरला तर १४ वर्षाच्या मुलांमध्ये जी.एम. टायगर व जी.एम पॅंथर हे संघ अंतिम फेरीत पोहोचले. या दोन्ही संघांमध्ये जीएम टायगर हा संघ विजेता ठरला. जी.एम.पी.एल क्रिकेट सामने यशस्वी होण्यासाठी प्रमुख प्रशिक्षक गोपाल श्रीयान यांच्यासोबतच जी. एम क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक सुनील श्रीयान, मंदार तांबे, पठाण सर, अशोक बंजान, संतोष जोशी, मुकेश चव्हाण, प्रवीण शिणघे यांचा देखील मोलाचा वाटा आहे. 

जीएम क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षिक गोपाल श्रीयान हे असून सध्या त्यांच्या अकॅडमीमध्ये २०० हून अधिक मुले क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहेत. आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून उत्तम फलंदाज, उत्तम गोलंदाज तयार व्हावेत आणि युवा पिढीने क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करावी हा गोपाल सरांचा उद्देश आहे. हल्लीच काही दिवसापूर्वी डोंबिवली कॅम्पमधून जीएम क्रिकेट अकॅडमी मधील पाच मुले मुंबई क्रिकेट अकॅडमी ( MCA) मध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामूळे जी एम क्रिकेट अकॅडमी चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post