मुंबई: महाराष्ट्रातील इयत्ता १० वी (एसएससी परीक्षा २०२४) आणि १२वी (एचएससी परीक्षा २०२४) बोर्ड परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अहवालानुसार, यावर्षी १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षांचे निकाल (SSC, HSC Exam Result 2024) वेळेवर जाहीर केले जातील असे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या निकालाबाबत अधिकृत घोषणा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच काही दिवसांत निकालाची तारीख आणि वेळ याबाबत अधिकृत घोषणा होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच इयत्ता १०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र बोर्डाने एसएससी (१०वी) आणि एचएससी (१२वी) २०२४ चे निकाल जाहीर करण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. या महिन्यात निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
नवीन अहवालानुसार, महाराष्ट्र बोर्ड १०वी आणि १२वीचे निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी इयत्ता दहावीचा निकाल २ जूनला तर बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर झाला होता.
या माध्यमातून निकाल पाहता येणार
MSBSHSE ने इयत्ता १० आणि १२चे निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थी बोर्डाच्या त्यांच्या अधिकृत वेबसाइट - mahresult.nic.in आणि results.gov.in ला भेट देऊन त्यांचे गुण तपासू शकतील. विद्यार्थी त्यांचे निकाल DigiLocker digilocker.gov.in वरून देखील डाउनलोड करू शकतात.
यावर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या दहावीच्या परीक्षा १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत आणि बारावीच्या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत झाल्या. या वर्षी राज्यभरात १४ लाखांहून अधिक विद्यार्थी १२वी आणि १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता १०वी बोर्डाची परीक्षा दिली होती. मागील वर्षांप्रमाणे यंदाही महाराष्ट्र बोर्ड टॉपर्सची यादी जाहीर करणार नसल्याचे सांगितले जात आहे.
.jpeg)