कल्की 2898 एडी या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केल्याचे पहावयास मिळत आहे. प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हसन असे मेगास्टार असलेला कल्की 2898 एडी २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सहा दिवसांमध्ये या चित्रपटाने ₹६८० कोटी कमावले.
Kalki 2898 AD हा जगभरातील सर्व भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून आतापर्यंत त्याने सर्व भाषांमध्ये ₹ ७०० कोटीच्या आसपास कमाई केली आहे. चित्रपट निर्मात्यांनुसार, चित्रपटाने मंगळवारी ₹५५ कोटींचा व्यवसाय केला, एकूण ₹६८० कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने उत्तर भारतात ₹ १५० कोटींची कमाई केली आहे आणि उत्तर अमेरिकेत $१२.७५ दशलक्ष कमावले आहेत.
चित्रपटाची नायिका दीपिका आणि तिचा नवरा अभिनेता रणवीर सिंग यांनी मुंबईतील एका थिएटरमध्ये कल्की 2898 एडी पाहिला. रणवीरने प्रभास, अमिताभ आणि कमल यांच्या अभिनयाचे कौतुक करत चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे पुनरावलोकनही केले.