नेते घडविणाऱ्या राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू

 




कृषिवलचे माजी संपादक आणि प्रख्यात पत्रकार संजय आवटे एका लेखात म्हणतात की "फिल्में सिर्फ तीन चीजों से चलती है... 

एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट!"

पण, हे फक्त फिल्मबद्दल खरं नाहीए. 

कोणत्याही फिल्मपेक्षा कसलं भन्नाट मनोरंजन आणि मनीरंजन सध्या महाराष्ट्रात सुरू आहे! 

मनोरंजन करण्यात कोणीच कसर सोडत नाहीए. वेशीवर टांगलेल्या अब्रूच्या लक्तरांच्या विजयी पताका झाल्या आहेत. 

दरोड्यांच्या आख्यायिकांना आता साहसकथांचे रूप आले आहे. 

(सगळ्यांनीच) कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळल्यानंतरचे हे दर्शन मोठे मनमोहक आहे! 


हशा.. टाळ्या आणि शिट्ट्यांसह,  

लोक एन्जॉय करत आहेत  हा 'राजकारण नावाचा भन्नाट पिक्चर'! 

तर दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की आता बाप लोकांनाच लढाई लढावी लागणार आहे,,आपापल्या बापांचा वारसा जपण्यासाठी.. यात भर म्हणून काही नेत्यांचा उल्लेख करावा लागेल मग ते शरद पवार असो , उद्धव बाळासाहेब ठाकरे असो ,वा शेकापचे जयंत पाटील असो..


अलीकडच्या काळात कोण कोणत्या पक्षाचा , विचारांचा हे काही सांगता येत नाही पण एवढे मात्र नक्की की लोक ठरवतील तीच भूमिका योग्य असते ,,, असे सातत्याने हे कुलगुरू महाराष्ट्रभर जिथे शेकाप नावाच्या विद्यापीठाचे कॉलेज आहे तिथे आवर्जून सांगत आहे ,,त्या कुलगुरूंचे नाव अर्थातच आदरणीय आमदार भाई जयंत पाटील.


वादळे येतात -वादळे जातात ..जाताना लक्षात राहते ते वादळाने केलेले आपले नुकसान ..पण तरीसुद्धा न डगमगता न थांबता काम करत राहायचे ..मच्छिमारांचे उत्पन्न कमी झालेय, शेतकरी जमिनी विकत चालला आहे ,,कधी अवकाळी तर कधी अवर्षणाने बागायतदारांचे नुकसान होतेय ,पर्यटनाला शासनाची साथ नाही ,पेट्रोल-डिझेल महागल्यामुळे रिक्षाचालक उदासीन आहेत , पाण्याच्या प्रश्नाने राज्यात उद्या गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे महिलांच्या आयुष्यातील आनंद हरवत चालला आहे..अशा अनेक प्रश्नांच्या फाईली तयार करून जयंत पाटील विधानपरिषदेत शासनाला प्रश्न विचारत आहेत ,,न्याय मागत आहेत ..मागच्या वेळेस  गणपतराव देशमुख ,बाळाराम पाटील,पंडितशेठ पाटील हे विधिमंडळामध्ये सोबत होते  ,आज यापैकी तिघांची सुद्धा विधिमंडळात सोबत नाही ,,त्यात हा लेख तुम्ही वाचत असताना भाई यावेळेला कसे निवडून येणार? याबाबत नाक्या नाक्यावर चर्चा सुरु आहेत...पण तरीसुद्धा आमदार जयंत पाटील हार न मानणारे योद्धे आहेत हे पाहायला मिळते ..लोकांमध्ये जाऊन ,त्यांच्या मनातील प्रश्नांना साद कशी घालायची हे पाटील परिवाराचे टॉनिक ते लहानपणापासून घेत असल्याने  पंडित पाटील, बाळाराम पाटील ,श्यामसुंदर शिंदे ,आस्वाद पाटील, प्रशांत नाईक ,प्रितम म्हात्रे , सुरेश खैरे ,बाबासाहेब देशमुख ,आशाताई शिंदे ,चित्रलेखा पाटील  यांच्या सहाय्याने नवीन संघ बांधत आहेत  ,,कोण आले -कोण गेले यावर विचार करण्यापेक्षा शासनाच्या रोजच्या गोंधळात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाणीवपूर्वक न झाल्याने अनेक कामे पेंडिंग आहेत त्यावर काम करूया ,,नव्या माणसांना ,कार्यकर्त्यांना उभारी देऊया असे म्हणून आजही न थकता दिवसाचे १६-१७ तास काम करत आहेत ...कुठून येतो हा आत्मविश्वास ? 


तुम्ही म्हणाल इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य असते ,,पण आजचे दिवस तसे बिलकुल नाही ..देश एकाधिकारशाहीच्या वळणावर उभा असल्याने सांगोलामध्ये बागायतदार का चिंतीत आहे ? रायगड मध्ये पाण्याचा प्रश्न का बिकट होतोय? किंवा समृद्धी महामार्गावर का अपघात वाढतायेत  हे पाहण्यात शासनकर्त्याना गरज वाटत नाही ...शेतकरी कामगार पक्ष हा राज्यातला छोटा पक्ष असल्याने हा पक्ष आणि या पक्षाचे नेते काय करत आहेत हे काही ठराविक इलेक्ट्रॉनिक माध्यमांना जाणून घेण्यात तर बिलकुल रस नाही कारण त्यातून ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही...पण तरीसुद्धा आपण काम करत राहायचे ..माणूस कोणत्या धर्मातील आहे हे पाहण्यापेक्षा त्याची समस्या काय आहे हे पाहून ती समस्या सोडविण्यासाठी काम करत राहायचे हे आमदार जयंत पाटील आपल्या कर्तृत्वातून दाखवून देतात.


अलीकडच्या काळात शेकापक्षावर फक्त टीका करायची अशा राजकारणातून स्वतःचा मार्ग निर्माण करणाऱ्यांची संख्या वाढत असताना शेकाप आणि आमदार जयंत पाटील मात्र यावर काहीच बोलत नाही ..असे शेकाप मधील अनेकांचे म्हणणे आहे ,,पण  खाजगीत आमदार जयंत पाटील यांना याबाबत विचारल्यावर ते सहज सांगतात ,,जयंत पाटील जेव्हा बोलेल तेव्हा सर्वांना बोजा गुंडाळावा लागेल ..जरा थांबा ,,प्रत्येकाची वेळ येते आणि ती वेळ कशी आणायची हे जयंत पाटीलांना नक्की कळते ...तूर्तास तुम्ही लोकांना भेटा त्यांच्या समस्या सोडवा ,,असेच ते सातत्याने सांगतात.


प्रभाकर पाटीलांनी या जिल्ह्यात प्रशासकीय कामात हातखंडा कसा असावा याबाबत आपले कसब दाखवले ,ऍड दत्ता पाटील यांनी विधिमंडळामध्ये सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना कशी वाचा फोडावी याचे आदर्श निर्माण केले , आयुष्यभर स्वतःच्या समृद्धीपेक्षा लोकांचे भले करण्यात आणि  एकनिष्ठतेचे धडे आचरणातून देणारे गणपतराव देशमुख संपूर्ण देशासाठी साधी राहणी -उच्च विचारसरणी म्हणून लोकप्रिय झाले , शेतकरी आंदोलनाची ताकद काय असू शकते हे एन.डी.पाटील यांच्या सारख्या धीरोदत्त नेत्याने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले , मीनाक्षी पाटील यांनी रायगडच्या मातीतील अनेक माता भगिनींच्या डोक्यावरून हंडा उतरवण्यासाठी पाण्याच्या प्रश्नावर सातत्याने काम केले , आज जेव्हा मुख्यमंत्री सोडा पण उपमुख्य मंत्री होण्यासाठी सुद्धा पक्षच घेऊन सत्तेसाठी व्याकुळ झालेले लोकप्रतिनिधी सर्वत्र दिसत आहेत तेव्हा थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर असतानासुद्धा ती धुडकावून एकनिष्ठता काय असते हे दाखवून देणारे भाई उद्धवराव पाटील यांच्या विचारसरणीतून निर्माण झालेला शेतकरी कामगार पक्ष लहान असो वा मोठा ,हार न मानणारा पक्ष आहे ..काम करणारा पक्ष आहे म्हणूनच तो ओळखला जावा यासाठी मी सदैव कार्यरत राहीन हे सांगणारे आमदार भाई जयंत पाटील.





महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणायचे शेकाप हा नेते घडविणारा पक्ष आहे ,,मग ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील असो वा अलिबागचे दिवंगत आमदार मधूशेठ ठाकूर  . हे पूर्वाश्रमीचे शेकाप कार्यकर्ते ते नेते ...ही राजकीय परंपरा कायम ठेवत आपल्या ३५ वर्षांच्या राजकीय कालखंडात भाईंनी देखील अनेक नेते घडवले सोबत अनेक सर्वोत्तम कामेही केली ..देशातील अग्रणी जिल्हा सहकारी बँक ,ग्राहकांच्या हितासाठी रायगड बाजार, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पीएनपी एज्युकेशन माध्यमातून इंग्रजी माध्यमांच्या शाळा, मच्छिमारांच्या उत्पादनाला थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून जेट्या, अलिबाग तालुक्याचे पर्यटन अधिक गतिमान करण्यासाठी जलवाहतूक सेवा या सारख्या माध्यमातून लोकांचे आर्थिक जीवनमान त्यांनी यशस्वीपणे बदलून टाकले ,,,राजकारण उद्या कसा रंग बदलेल हे सांगता येत नाही पण तूर्तास  २१ व्या शतकातील आर्थिक सुधारकास अर्थात आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


- संदीप जगे

अलिबाग



Post a Comment

Previous Post Next Post