नवी दिल्ली : भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे प्रणाली आहे जी करोडो लोकांसाठी किफायतशीर आणि सुलभ प्रवासाचे एकमेव साधन आहे.मात्र गेल्या काही काळापासून रेल्वेमध्ये प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अशा अनेक मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामागे वेगवेगळी कारणे दिली जात असली तरी यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तुम्हीही ट्रेनने कुठेतरी जाण्याच्या तयारीत असाल तर रद्द झालेल्या गाड्यांची यादी एकदा तपासून पहा.
रद्द केलेल्या रेल्वे गाड्यांची यादी
ट्रेन क्रमांक ११२६५ जबलपूर-अंबिकापूर एक्स्प्रेस १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान रद्द
ट्रेन क्रमांक ११२६६ अंबिकापूर-जबलपूर एक्स्प्रेस १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान रद्द
ट्रेन क्रमांक १८२४७ बिलासपूर-रीवा एक्स्प्रेस १५ ते १९ नोव्हेंबरदरम्यान रद्द.
ट्रेन क्रमांक १८२४८ रेवा-बिलासपूर एक्स्प्रेस १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान रद्द.
ट्रेन क्रमांक ११७५१ रेवा-चिरमिरी पॅसेंजर स्पेशल १८ नोव्हेंबर रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक ११७५२ चिरमिरी-रेवा पॅसेंजर स्पेशल १९ नोव्हेंबर रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १८२०३ दुर्ग-कानपूर एक्सप्रेस १७ नोव्हेंबर रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १८२०४ कानपूर-दुर्ग एक्सप्रेस १८ नोव्हेंबर रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १८२०५ दुर्ग-नौतनवा एक्सप्रेस १४ नोव्हेंबर रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक १८२०६ नौतनवा-दुर्ग एक्सप्रेस १६ नोव्हेंबर रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक ०५७५५ चिरमिरी-अनुपपूर पॅसेंजर स्पेशल १९ नोव्हेंबर रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक ०५७५६ अनुपपूर-चिरमिरी पॅसेंजर स्पेशल १९ नोव्हेंबर रोजी रद्द राहील.
ट्रेन क्रमांक ०८२६९ चिरमिरी-चांदिया रोड पॅसेंजर स्पेशल १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान रद्द.
ट्रेन क्रमांक ०८२७० चांदिया रोड-चिरमिरी पॅसेंजर स्पेशल १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान रद्द.
ट्रेन क्रमांक ०६६१७ कटनी-चिरमिरी मेमू स्पेशल १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान रद्द.
ट्रेन क्रमांक ०६६१८ चिरमिरी-कटणी मेमू स्पेशल १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान रद्द.
कोणतीही ट्रेन रद्द करण्यामागे भारतीय रेल्वेकडे ठोस कारण असल्याचे म्हटले आहे. रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात अनेक मार्गावर विकासकामे सुरू आहेत. अशावेळेस प्रवाशांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी गाड्या थांबवल्या जातात.
