जयंत पाटील यांची टीका
अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : भविष्यात कुरुळ ग्रामपंचायत नगरपालिकेत विलीन होऊन विकासाची कवाडे अधिक उघडली जातील. सध्याच्या परिस्थितीत अलिबाग तालुका वीस वर्षांनी मागे गेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकासासाठी मुद्दे सादर करणे गरजेचे असू महायुतीच्या आमदाराने विकासाचा दृष्टिकोन ठेवला नाही, यामुळे अपेक्षित विकासकामे होऊ शकली नसल्याचे सांगत मर्यादा उल्लंघन केल्याने अलिबागचे नाव देखील खराब झाले आहे. पैसे घेऊन पक्ष बदलणाऱ्या आमदाराला मतदार राजकारणातून हद्दपार करणार यात तिळमात्र शंका नसल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
कोरोना काळात शेतकरी कामगार पक्षाने गरजूंना धान्य वाटप केले. तळागाळात शिक्षणाची गंगा पोहचविण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनींना शाळेत जण्यासाठी आणि शिक्षणाला गती मिळावी यासाठी सायकल वाटप केल्या. मतदारसंघातील जनतेला दृष्टी मिळावी यासाठी चष्मे दिले आहेत. अलिबागच्या जनतेने दूरदृष्टी ठेवून सुशिक्षित असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
अलिबाग विधानसभा मतदारसंघातील जनता आमदाराच्या वागणुकीला कंटाळली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला महाविकास आघाडीतील घटक पक्ष जिद्दीने उभे राहिले आहेत. मतदारसंघात काँग्रेस , उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, आम आदमी पार्टी असे विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या या कमागिरीचे फलित निश्चित मिळणार असून महाविकास आघाडीचा उमेदवार विधानसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.


