दिव्यातील ठाणे मनपा शाळा क्र. ९८ मध्ये वीर बाल दिवस साजरा

 



दिवा,  (आरती परब) : वीर बाला दिवसाच्या निमित्ताने ठाणे मनपा शाळा क्र. ९८ येथे एक वेगळ्या पद्धतीने वीर बाला दिवस साजरा केला. ठाणे महापालिका आणि पंतप्रधान कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली, शाळेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वीर बाला दिवसाचा लाईव्ह व्हिडिओ दाखवला. यावर्षी शाळेने आपली  विद्यार्थिनी कू. साक्षी संजय यशवंते हिला तिच्या साहसी कृत्यासाठी सन्मानित केले.



१२ वर्षांच्या साक्षी संजय यशवंते ह्या सातवीतील विद्यार्थिनीने साहसी कृत्य करत एक महिन्याचे नवजात बाळ वाचवले. सकाळी शाळेत येताना जेव्हा साक्षी रेल्वे पूलावरून जात असताना तिने एका पती-पत्नीमध्ये होणाऱ्या झुंबडीची गडबड पाहिली. दोघेही मद्यपान केलेले होते अन् पती पत्नीला मारहाण करत होता. त्याच वेळी, मद्यधुंद पत्नी नवजात बाळ रेल्वे पुलावरून फेकण्याचा प्रयत्न करत होती.
साक्षीने प्रसंगावधान दाखवून फेकलेल्या बाळास अलगदपणे पकडले आणि जवळपास असलेल्या लोकांनाही मदतीसाठी ओरडून सांगितले. तीने दाखवलेले धाडस खरोखर अवर्णनीय आहे. तिचे हे धाडस स्वतः तिच्या आजीने समक्ष पाहिले. जमावाने त्वरित पोलीसांना पाचारण करून बाळाला त्यांच्या ताब्यात दिले. अशाप्रकारे एका नवजात बालिकेचा जीव वाचवून सुरक्षा केली. तिच्या या शौर्याच्या कृत्यामुळे शाळेने साक्षीला वीर बाला म्हणून सन्मानित केले आणि तिचे साहस सर्व विद्यार्थ्यांसमोर सादर केले. 



     अशाप्रकारे अनोख्या पद्धतीने वीर बाला दिवस शालेय स्तरावर वरिष्ठ विज्ञान शिक्षिका सौ. कविता हरिदास चौधरी यांच्या शुभहस्ते, प्रभारी मुख्याध्यापिका सौ. प्रमिला जगताप मॅडम व शिक्षक वृंदाच्या उपस्थितीत वीर बाला कु. साक्षी यशवंते हिला पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन गौरवण्यात आले. ठाणे मनपा शाळा क्र. ९८ च्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी साक्षीच्या या अविस्मरणीय कृत्याचे कौतुक केले. वीर बाला दिवसाच्या या अनोख्या कार्यक्रमात साक्षीचा बहुमान वाढवण्यासाठी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post